मोहिते-पाटील यांना महाविकास आघाडी सरकारचा दुसरा झटका ; अवसायकपदी ए. ए. गावडे यांची नियुक्ती

सुनील शिरापूरकर यांनी अंतरिम आदेश दिनांक २० मी २०२१ रोजी काढलेल्या आदेशामध्ये राजहंस सहकारी कुक्कुटपालन संघ लिमिटेड अकलूज हा संघ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम ९ अन्वये २२ मार्च १९६५ रोजी नोंदविलेला आहे. सदर संघाचे मागील पाच वर्षापासून बंद आहे असे संघाच्या मागील लेखापरीक्षण अहवालावरून दिसून येते तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध सोलापूर यांचेकडे संदर्भ क्रमांक दोनच्या अहवालावरून असे दिसून येते, की संघाच्या नियमातील उद्देशा प्रमाणे सदर संघाचे कामकाज सुरू असल्याचे दिसून येत नाही.

    पुणे : अकलूज तालुका माळशिरस येथील राजहंस सहकारी कुकुट पालन संघ हा संघ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० कलम ९ अन्वये १९६५ साली नोंदणी केलेल्या संघावर लिलाव करण्याचे आदेश सुनील शिरापूरकर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध ) पुणे विभाग पुणे यांनीए.ए. गावडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) सोलापूर यांची अवसायक म्हणून नियुक्ती केलेली आहे. राजहंस कुकूटपालन संघाच्या स्थावर मालमत्तेवर शिवरत्न शिक्षण संस्था यांनी नॉलेज सिटी उभारलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे  लक्ष लागून राहिलेले आहे.

    सुनील शिरापूरकर यांनी अंतरिम आदेश दिनांक २० मी २०२१ रोजी काढलेल्या आदेशामध्ये राजहंस सहकारी कुक्कुटपालन संघ लिमिटेड अकलूज हा संघ महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम ९ अन्वये २२ मार्च १९६५ रोजी नोंदविलेला आहे. सदर संघाचे मागील पाच वर्षापासून बंद आहे असे संघाच्या मागील लेखापरीक्षण अहवालावरून दिसून येते तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध सोलापूर यांचेकडे संदर्भ क्रमांक दोनच्या अहवालावरून असे दिसून येते, की संघाच्या नियमातील उद्देशा प्रमाणे सदर संघाचे कामकाज सुरू असल्याचे दिसून येत नाही.

    तसेच संघाच्या सभासद संस्थेचे उत्पादन बंद असल्याने संघाच्या उपविधी तील नमूद उद्देशा प्रमाणे कामकाज पार पडले नसल्याकारणाने संघाचा मुख्य उद्देश साध्य झाला असे म्हणता येत नाही.संदर्भ क्रमांक तिनं अन्वये संघास नोटीस देऊन ३१ ऑगस्ट २०२० पूर्वी खुलासा सादर करण्यास सांगितला होता त्यावर आपल्या संघाने संदर्भ क्रमांक ४ अन्वये ३१ ऑगस्ट २०२० रोजी दिलेल्या खुलाशात असे दिसून येते की, संघाचे कामकाज अद्यापही बंद असल्यामुळे व संघाने सादर केलेला खुलासा समाधान कारक नसल्यामुळे संघाविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ (१)( क ) (२) व (४) अन्वय अंतरिम अवसायानात घेण्याची कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याने मी खालील आदेश पारित करीत आहे. मी सुनील शिरापूरकर विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे विभाग पुणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम१९६० चे कलम १०३ (१)( क ) (२) व (४) मधील तरतुदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारास अनुसरून राजहंस सहकारी कुक्कुटपालन संघ लिमिटेड अकलूज या संघावर अवसायानाचा अंतरिम आदेश पारित करीत आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३ (१) ए.ए. गावडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध सोलापूर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.

    संघाने सदर अंतरिम आदेश याबाबतचे आपले स्पष्टीकरण या आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत या कार्यालयास सादर करावे असे पत्र चेअरमन /कार्यकारी संचालक राजहंस सहकारी कुक्कुटपालन संघ लिमिटेड अकलूज पोस्ट शंकरनगर यांना पाठवलेले असून सदरच्या प्रति सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध महाराष्ट्र राज्य मुंबई, उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालय औंध पुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सोलापूर ,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध सोलापूर, ए .ए .गावडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध सोलापूर यांना आर पी ए डी ने पाठवलेले आहे.महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मोहिते पाटील यांच्याकडे पर्यटन खात्याकडील अनेक वर्ष असणारे रत्नागिरी येथील रत्नसागर रिसॉर्ट हे थ्री स्टार हॉटेल गेल्या चार-पाच महिन्यांपासून शासनाने ताब्यात घेतलेले आहे. सदरचे रिसॉर्ट ताब्यात घेण्याचे मुदत संपली का दुसरे कारण आहे स्पष्ट झालेले नाही तोपर्यंत राजहंस कुक्कुटपालन संघाच्या स्थावर मालमत्तेचा  मोहिते-पाटील यांना महा विकास आघाडी सरकारचा दुसरा झटका दिला असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे.