बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून १४ वर्षीय मुलीचा विनयभंग ; हिंजवडी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

राकेश दलालने गेल्या पाच वर्षांपासून बॅडमिंटनचे शिक्षण घेत असलेल्या मुलीचा विनयभंग केला. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी आरोपीला याप्रकरणी अटक केली. शनिवारी सकाळी आरोपी राकेशने पीडित मुलीला शटल बॉक्स हा जिमधील लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितला.

    पुणे : बालेवाडी येथे बॅडमिंटन प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॅडमिंटन प्रशिक्षकाने १४ वर्षीय बॅडमिंटनपटू असलेल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रशिक्षक राकेश यशवंत दलाल (३६) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीने आईला घटनेची माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश दलालने गेल्या पाच वर्षांपासून बॅडमिंटनचे शिक्षण घेत असलेल्या मुलीचा विनयभंग केला. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी आरोपीला याप्रकरणी अटक केली. शनिवारी सकाळी आरोपी राकेशने पीडित मुलीला शटल बॉक्स हा जिमधील लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितला. त्यापाठोपाठ आरोपी राकेश देखील गेला. त्यानंतर पीडित मुलीसोबत राकेशने बोलण्यास सुरुवात केली. “तू शुक्रवारी खेळायला का येत नाहीस? तू चांगली खेळाडू आहेस, मला तुझा खेळ फार आवडतो. मला तुला फार वरती घेऊन जायचं आहे. तू आज देखील चांगली खेळली आहेस,” असे म्हणून राकेशने शेकहॅन्डसाठी हात पुढे केला. राकेश दलाल प्रशिक्षक असल्याच्या नात्याने कौतुक करत असतील म्हणून पीडित मुलीने हात पुढे करून हातात हात मिळवला. तेव्हा, राकेशने मुलीला मिठीत घेतले.

    या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तेथून निघूण जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, राकेश हा पीडितेला थांबविण्याचा प्रयत्न करत होता असे तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेची माहिती पीडित मुलीने आई दिली आणि हिंजवडी पोलीस ठाणे गाठत प्रशिक्षाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी राकेशला बेड्या ठोकल्या आहेत.