सराईत गुन्हेगाराकडून विवाहितेचा विनयभंग

फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे भांडण झाले. त्यामुळे घरमालकाने पतीला मोहननगर येथे काही दिवस राहण्यास पाठविले. याचा फायदा घेत शनिवारी (दि. २४) मध्यरात्री आरोपी सोनू हा विवाहितेच्या घरी आला.

    पिंपरी : सराईत गुन्हेगाराने विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. २४) मध्यरात्री मोरेवस्ती, चिखली येथे घडली. सोनू बाळासाहेब शिंदे (रा. मोरेवस्ती, चिखली) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने सोमवारी (दि. २६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे भांडण झाले. त्यामुळे घरमालकाने पतीला मोहननगर येथे काही दिवस राहण्यास पाठविले. याचा फायदा घेत शनिवारी (दि. २४) मध्यरात्री आरोपी सोनू हा विवाहितेच्या घरी आला. मी येथे आजच्या दिवस झोपू का’ अशी विचारणा करत तिचा विनयभंग केला. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात खूनी हल्ला आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.