येत्या १२ जुलैपासून राज्यात ‘मान्सून’ पुन्हा सक्रिय होणार ; पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज

उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर ११ जुलै रोजी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलिए आहे. दरम्यान वेगवागन वाऱ्यासह विजांचा कडकडाटह होण्याची शक्यता आहे.

    पुणे: यंदा आगमनानंतर काही दिवसातच दडी मारले मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. येत्या १२ जुलैपासून देशासह महाराष्ट्रातही (Maharashtra) मान्सूनन(Monsoon) हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात रखडलेला मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय होणार आहे. (Maharashtra Rain) त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे.

    पुणे वेधशाळेनं (IMD) कोकण , विदर्भ घाटमाथ्यावर मुसळधार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदमाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

    उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर ११ जुलै रोजी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्हांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलिए आहे. दरम्यान वेगवागन वाऱ्यासह विजांचा कडकडाटह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहेत .

    सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती ही राज्यातील मान्सूनच्या पुरागमनाला कारणीभूत आहे. पुढील काही दिवस राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.