कोरोनाला हद्दपार करण्यासाठी या उपाययोजनांची अधिक गरज – अजित पवार

बारामती - राज्यात कोरोना फोफावला आहे. देशात कोरोनाच्या आकडेवारीत महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे.

 बारामती – राज्यात कोरोना फोफावला आहे. देशात कोरोनाच्या आकडेवारीत महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच लोकांनी सार्वजनिक शिस्त अंगीकारावी. प्रशासनाने केलेल्या अहवानाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि कोरोना रोखण्यासाठी काही नियम हे पाळावेच लागतील. आणि शासनाने जारी केलेल्या नियमावली व नियमांचे पालन करुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. अजित पवार यांनी बारामती येथे कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळेला त्यांनी वक्तव्य केले. 

कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी तसेच उद्याला कोरोना फोफावू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे तसेच सतर्क राहून काम केले पाहिजे, कुठेही निष्काळजी पणा किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. सोशल डिस्टंन्सिंग बाबत कडक कारवाई करावी, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना क्वारंटाईन करावे. जिल्ह्यातील कोविड आणि नॉन कोविड रुग्णांची योग्य वेळेत तपासणी करुन त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात यावे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले