voter list

मागील वेळेच्या तुलनेत यंदा १ लाख ४५ हजार ९३८ मतदार अधिक आहेत. एक सदस्यिय निवडणुका होणार असल्याने प्रत्येक वॉर्डाची लोकसंख्या १२ ते १४ हजार असेल.त्यासाठी सन २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात येत आहे.

    पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरात सद्यस्थितीत एकूण १३ लाख ३८ हजार २७ मतदार आहेत चिंवडमध्ये सर्वाधिक साडेपाच लाख मतदार आहेत.आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी आणखी मतदार नाव नोंदणी सुरु आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

    शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे एकूण ३ विधानसभा मतदारसंघ आहेत. भोसरी मतदारसंघात एकूण४ लाख ५१ हजार ३५७ मतदार आहेत. चिंचवडमध्ये सर्वाधिक ५ लाख ५२ हजार ८६८ मतदार आहेत.पिंपर- विधानसभा मतदार संघात ३ लाख ५७ हजार ८१२ मतदार आहेत, तर सद्यस्थितीत शहरात एकूण १३ लाख ३८ हजार २७ मतदारांची नोंद आहे.सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शहरात एकूण ११ लाख ९२ हजार ८९ मतदार होते.त्यात पुरुष मतदार ६ लाख ४० हजार ६९६ तर, महिला मतदार ५ लाख ५१ हजार ३६२ होते.

    मागील वेळेच्या तुलनेत यंदा १ लाख ४५ हजार ९३८ मतदार अधिक आहेत. एक सदस्यिय निवडणुका होणार असल्याने प्रत्येक वॉर्डाची लोकसंख्या १२ ते १४ हजार असेल.त्यासाठी सन २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात येत आहे.वॉर्ड रचनेचा आराखडा तयार होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे.