gutkha seized in chakan

अवैधरित्या गुटखा विक्री (gutkha sell)प्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल सव्वा पाच लाखांचा गुटखा आणि साडेतीन लाखांचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त(police seized gutkha) केला आहे.

    पिंपरी: अवैधरित्या गुटखा विक्री (gutkha sell)प्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल सव्वा पाच लाखांचा गुटखा आणि साडेतीन लाखांचा टेम्पो असा एकूण पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त(police seized gutkha) केला आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. नीरज जसराम बन्सल याला पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चाकण पोलिसांना माहिती मिळाली की, पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे एका टपरी मध्ये अवैधरीत्या गुटखा विक्री सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपी निरज बन्सल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ हजार ८५० रुपये किमतीचा पान मसाला व तंबाखू असा गुटखा जप्त केला. आरोपी नीरज बन्सल याने हा गुटखा अंकुर गुप्ता याच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी अंकुर गुप्ता याचा ठावठिकाणा शोधून त्याच्याकडून पान मसाला तसेच अन्य प्रकारचा गुटखा आणि एक टेम्पो जप्त केला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण आठ लाख ७६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.