मोशीतील मार्केट काही शर्तीवर नियमितपणे सुरू

पुणे : मोशीतील मार्केट काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पण आता मार्केट लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे. टाळेबंदीत नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंची झळ पोहोचू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने उपाययोजना सुरू केली आहे.

 पुणे : मोशीतील मार्केट काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पण आता मार्केट लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे. टाळेबंदीत नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला  तसेच जीवनावश्यक वस्तूंची झळ पोहोचू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने उपाययोजना सुरू केली आहे. मार्केट यार्डातील गूळ आणि भुसार बाजाराचे कामकाज बुधवारपासून नियमित झाले असून मोशी येथील भाजीपाल्यांच्या उपबाजाराचे कामकाज रात्रीपासून सुरू झाले. लवकरच मांजरी, उत्तमनगर येथील भाजीपाल्यांचे उपबाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला लक्षात घेता मोशीतील मार्केट बंद करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर बुधवारपासून (१५ एप्रिल) भुसार बाजार सुरू झाला. त्यानंतर मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजाराचे कामकाज बुधवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत शेतीमालाची आवक मोशीतील उपबाजरात होईल. त्यानंतर शेतीमालाच्या गाडय़ांना मोशीतील उपबाजारात प्रवेश दिला जाणार नाही. आवक झालेल्या शेतीमालाची विक्री पहाटे दोन ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मार्केट मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच विनामास्कचे कोणालाही मार्केट मध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे देखील सांगितले आहे. 
मोशीतील उपबाजारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार नाही. आडत्यांनी फक्त घाऊक खरेदीदारांना भाजीपाल्याची विक्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार आवारातील सर्व व्यवहार सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवून करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या शहरात भाजीपाल्याचा पुरवठा पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर, हवेली, मंचर, खेड भागातील शेतकरी करत आहेत. तूर्तास शहरात भाजीपाल्याचा तुटवडा नाही. भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत झाल्यास तुटवडा जाणवणार नाही. भाजीपाल्याचे दर वाढलेले नाहीत. करोनामुळे हॉटेल, खाणावळी बंद आहेत तसेच लग्नसराई नसल्याने भाजीपाल्याच्या मागणीत नेहमीच्या तुलनेत घट झाली आहे, असे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.