western Ghat

पुणे जिल्ह्यात पाणथळ, गवताळ अशा विविध प्रदेशांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यामध्ये विविध पक्षी, वन्यप्राणी, उभयचार प्राणी, कीटक अशा विविध प्रकारांतील प्राण्यांचा समावेश आहे. मात्र आता या वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत असल्याने त्यांच्यावर आधारित बहुतांश प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

पुणे : निसर्ग संपन्न पश्चिम घाट (Western Ghats ) हा जागतिक स्तरावारील जैवविविधतेचा (biodiversity) केंद्र आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील मोठा भाग हा पश्चिम घाटाचा भागआहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्राणी-पक्षी, वनस्पतींचा अधिवास आहे. परंतु वाढती लोकसंख्या, विकासप्रकल्प यांच्या विळख्यात अडकलेला हा अधिवास संकटात (threat to biodiversity) सापडला आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेाठी त्यांचा अधिवास जपण्याची गरज वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

पुणे जिल्ह्यात पाणथळ, गवताळ अशा विविध प्रदेशांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यामध्ये विविध पक्षी, वन्यप्राणी, उभयचार प्राणी, कीटक अशा विविध प्रकारांतील प्राण्यांचा समावेश आहे. मात्र आता या वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत असल्याने त्यांच्यावर आधारित बहुतांश प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

गवताळ प्रदेशांना विकासकामांचा धोका

तरस, लांडगा, कोल्हे, चितळ यासारखे प्राणी, तर माळढोक, तणमोर यासारखे पक्षी प्रामुख्याने गवताळ प्रदेशात आढळतात. मात्र गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने होणारी बांधकामे, शेतीचा विस्तार आणि बदलणारे स्वरुप तसेच इतर विकास प्रकल्प यामुळे गवताळ प्रदेश नष्ट करुन तो नष्ट करण्यात आला.