राज्य सरकारच्या ‘या भूमिकेमुळे भटक्यांचे संपूर्ण आरक्षणच धोक्यात; भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे आंदोलन

    पुणे: महाराष्ट्र भटके विमुक्त ( VJ/NT) समाजाच्या नोकरीतील पदोन्नती बाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात भटके विमुक्त (VJ/NT) यांचे सध्याचे पदोन्नती मधील आरक्षण हे संविधानिक नाही असे राज्य सरकारने म्हटल्याने भाजपा भटके विमुक्त आघाडी पुणे शहर अध्यक्ष राजेश धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    राज्य सरकारच्या ‘या’ भूमिकेमुळे भटक्यांचे संपूर्ण आरक्षणच धोक्यात आले आहे. यामुळे सध्या सर्वात हलाखीचे जीवन जगणाऱ्या भटक्या समाजाची परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. भटके विमुक्त जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सुचनेनुसार भाजप भटके विमुक्त आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा करून मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. या प्रसंगी राजेश धोत्रे, धनंजय जाधव ,अशोक वनवे, भगत सिंग कल्याणी ,बंडु जाईभाई ,निता थोरवे ,वनिता सोपे ,प्रविण बडगुजर, डॉ. उज्ज्वला हाके, गुरू लोखंडे ,शैलेश काची ,रामचंद्र धनगर, शक्ती सिंग कल्याणी, मारुती पाथरवट आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते