वीजबील माफीसाठी महावितरणसमोर रिपब्लिकन युवा मोर्चाचे आंदोलन

बारामती : कोरोनामुळे सर्वच घटकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने कोरोना काळातील वीज ग्राहकांची सरसकट वीजबील माफ करण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोना राष्ट्रीय आपत्तीत देशातील सर्व घटकांचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते ,यामध्ये प्रामुख्याने लघुउद्योजक छोटे मोठे व्यावसायिक यांचे व्यावसाय डबघाईला आले आहेत. तर असंख्य लोक रोजगारापासून वंचित झाले आहेत.

महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे ञिशंकु सरकार असून जनहितासाठी ते निर्णायक काम करत नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोना राष्ट्रीय आपत्तीत लोकांचे जगणे जिकरीचे झाले आहे सरकारने मध्यम मार्ग म्हणून काही दिवसांपुर्वी ५० टक्के विजबिल माफी बाबत अहवाल तयार केला होता,परंतु महाविकास आघाडीत तारतम्य नसल्यामुळे सदर सरसकट विजबिल माफीचा प्रस्ताव पुढे रेंगाळला ,अशी टीका यावेळी करण्यात आली.

बारामती तालुका शहर व ग्रामीण भागातील रिपब्लिकन युवा मोर्चा व बारामती मधील बहुजन संघटनांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्तपणे हे आंदोलन करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय लोंढे , पुर्व विभाग पुणे अध्यक्ष अनिल मोरे , बारामती तालुका उपाध्यक्ष आनंद काकडे , सामाजिक कार्यकर्ते संदिप बनसोडे यांच्यासह शेरसुहास मिञ मंडळ व मानव एकता युवक संघटना प्रमुख भारत अहिवळे , शुभम अहिवळे , मार्केट कमिटीचे विलास पोमणे , काँग्रेस शहर युवक अध्यक्ष योगेश महाडीक , आनंद माने आदी उपस्थित होते.

महावितरणचे अधिकारी प्रकाश देवकाते धनंजय गावडे यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्या समजून घेऊन सर्व मागण्या शासन दरबारी पोहचवून लेखी आश्वासन दिले .तसेच कोरोना काळात आलेल्या विजबिलांची फेरतपासणी आढाव चुकून लादलेली जादा बिले यांचे सर्व्हेक्षण योग्य तपासणी मोहिम राबवून जनतेसाठी हितार्थ निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.