MP Sambhaji Raje criticizes Sharad Pawar and Mahavikasaghadi government

“मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, आता सारथी संस्थेमार्फत राबविला जाणार तारा दूत प्रकल्प बंद पडला आहे. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे” असे संभाजीराजे म्हणाले.

पुणे : तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी पुण्यातील सारथी कार्यालय बाहेर मागील सहा दिवसापासून सेवक बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि महा विकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

“मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, आता सारथी संस्थेमार्फत राबविला जाणार तारा दूत प्रकल्प बंद पडला आहे. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे” असे संभाजीराजे म्हणाले.

सारथी संस्थेच्या माध्यमातून तारादूत प्रकल्प राबविला जात होता. मात्र, मागील कित्येक महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. यामुळे या प्रकल्पा अंतर्गत काम करणार्‍या सेवकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या मागणीसाठी सहा दिवसापासून सेवक सारथी संस्थे बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. मात्र याकडे या महा विकास आघाडी सरकारचे लक्ष नाही किंवा दखल देखील घेतली जात नाही. ही निषेधार्थ बाब असून या प्रश्न मी लवकरच शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही संभाजीराजेंनी यावेळी सांगीतले.

सारथी संस्थेला स्वायत्तता देणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विभागाने सारथी संस्थेला स्वायत्तता प्रदान देखील केली. मात्र, सारथीचे अधिकारी कलम २५ च्या माध्यमातून आम्हाला स्वायत्तता असल्याचे सांगत आहेत. मग कसली स्वायत्तता असा सवाल उपस्थित करीत या आंदोलनकर्त्यांसाठी रस्त्यावर पुन्हा उभे राहावे लागेल असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला यावेळी दिला.