माजी खासदार संजय काकडे यांनी मेव्हण्याला दिली गोळया घालण्याची धमकी

पुणे : व्यावसायिक स्पर्धेतून उद्योजक आणि माजी खासदार संजय काकडे यांनी सख्ख्या मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आहे. ‘माझे संबंध अनेक गुंडाशी असून, नीट रहा’,असे म्हणत त्यांनी मेव्हण्याला धमकावले आहे .  याप्रकरणी युवराज ढमाले (वय ४०, रा. धनकवडी) यांनी चतु: श्रुगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय काकडे आणि  पत्नी उषा काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.