sanjay raut

विरोधी पक्षाने आपले महत्व जाणून घेत १०५ एवढे संख्याबळ असताना समांतर सरकार चालवत आहोत असा विचार करणे गरजेचे आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आणि सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही," अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पुणे : राज्य कारभार उत्तम चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभाव जाणवत आहे. विरोधी पक्षाने आपले महत्व जाणून घेत १०५ एवढे संख्याबळ असताना समांतर सरकार चालवत आहोत असा विचार करणे गरजेचे आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आणि सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही,” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

चांगल्या विरोधकांचं स्वागत करायला हवे असे माझे ठाम मत आहे. परंतु, विरोधी पक्ष अस्तित्वात राहू नये असे केंद्र सरकारला वाटते. लोकशाहीत उत्तम विरोधी असल्याशिवाय खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होत नाही.पण राज्यात सत्तांतर घडल्यादिवसापासून विरोधी पक्षाने सरकारविरोधात जी काही भूमिका घेतली ती लोकशाहीला पूरक नाही. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. असे संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

यादरम्यान काही लोकांमध्ये ठाकरे सरकार १५ दिवसांत कोसळेल अशा पैजा सुद्धा लागल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारची लवकरच वर्षपूर्ती होते आहे. आणि आमचे सरकार पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असून ते पाच वर्ष टिकेल असे ठाम मत नोंदवताना शिवसेनेचे खासदार व महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार संजय राऊत यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.