इंदापूर येथील शिवभोजन थाळी केंद्राला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट; केले कामाचे कौतुक

    भिगवण : भिगवण तालुक्यातील इंदापुर येथे महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन थाळी केंद्राला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि.१४) भेट दिली. त्यावेळी त्यांनी या योजनेच्या कामाचे कौतुक केले.

    शिवभोजन थाळी या महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची उपासमार थांबली असून, या योजनेचा लाभ सर्वाधिक गोरगरीब जनतेला द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्यासमवेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर उपस्थित होते.

    तसेच तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष धनाजी थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादी खजिनदार सचिन बोगावत, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस सतीश शिंगाडे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, महेश शेंडगे, आण्णासाहेब धवडे आदी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, भिगवण शिवभोजन थाळीचे चालक भारती सुरेश बिंबे यांनी उपस्थितांचे आभार मानले.