खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, पुण्यात रुबी रुग्णालयात उपचार सुरु

दिल्लीतून(Delhi) परत आल्यानंतर उदयनराजे यांना कोरोनाची लागण(Udayanraje Corona Positive) झाली असल्याचे समोर आले.

    मुंबई: खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण(Mp Udayanraje Bhosale Corona Positive) झाली आहे. उदयनराजे भोसले यांच्यावर पुण्यातील(Pune) रुबी हॉस्पिटलमध्ये(Ruby Hospital) उपचार सुरु आहेत. मागील चार दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

    दिल्लीतून(Delhi) परत आल्यानंतर उदयनराजे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. कोरोनाची लागण झाली आहे हे समजताच त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.