MPSC : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गर्दी क्लासचालक, मेसचालक आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांची!

पुण्यात नवी पेठेमध्ये सुरुवातीला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहभाग नोंदविल्यावर हळूहळू गर्दीत मेसचालक, क्लासचालक आणि विविध नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दीला भव्य रूप देण्याचा प्रयत्न केला.

    १४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पुण्यात पाहायला मिळाला एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. मात्र या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत मोठ्याप्रमाणावर क्लासचालक, मेसचालक आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती .

    पुण्यात नवी पेठेमध्ये सुरुवातीला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहभाग नोंदविल्यावर हळूहळू गर्दीत मेसचालक, क्लासचालक आणि विविध नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दीला भव्य रूप देण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान MPSC च्या परीक्षांसाठी पुण्यात अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.