MPSC परीक्षा व्हायलाच हव्यात, सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल अन्यथा… ; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा

सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा प्रश्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे,

    महाराष्ट्रामध्ये कोरोना संकट आणि मराठा आरक्षण स्थगिती यांच्यामुळे मागील वर्षभरात तब्बल चार वेळा एमपीएससी २०२० पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. आजही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेली एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला . पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार्‍या अनेकांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला आहे. यावेळेस भाजपचे गोपिचंद पडळकर देखील विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून चक्काजाम करताना दिसले.यावेळी पाडळकरांनी MPSC परीक्षा व्हायलाच हव्यात, सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल तसेच जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोवर रस्त्यावरून बाजूला हटणार नाही असा इशारा सरकारला दिला.

    काय म्हणाले पडळकर ?

    सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा प्रश्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे, तसेच जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोवर रस्त्यावरून बाजूला हटणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.