पिंपळगाव व पारगाव शाखेतून महावितरणकडून कृषीपंपाची विक्रमी नऊ कोटी रुपयांची थकबाकी वसुली !

पिंपळगाव व पारगाव शाखेत २४ दिवसात नऊ कोटी रुपयांची थकीत वसुली झाल्याने महावितरणचे बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील पावडे,अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील बारामती मंडळ यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

    पारगाव : दौंड तालुक्यात मार्चपासुन सुरु केलेल्या कृषीपंप थकबाकी वसुली मोहिमेस महावितरणला केडगाव विभागातर्गत असलेल्या पिंपळगाव व पारगाव शाखेतून ६६८६ थकबाकीदार ग्राहकांनी महावितरणला कृषीपंपाची विक्रमी नऊ कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली असून इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी थकबाकी वसुली झाली आहे.

    पिंपळगाव व पारगाव शाखेत २४ दिवसात नऊ कोटी रुपयांची थकीत वसुली झाल्याने महावितरणचे बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील पावडे,अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील बारामती मंडळ यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

    केडगाव विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके,उपकार्यकारी अभियंता संजय मालपे यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव उपविभागीय कार्यालया अंतर्गत पिंपळगाव शाखेतील सर्व कर्मचारी,शाखा अभियंता यांच्या सहकार्यातून घरगुती व्यावसायिक व औद्योगिक तसेच कृषी ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर डिस्कनेक्शन ड्राइव्ह महावितरणच्या केडगाव उपविभागातील सर्व शाखामध्ये राबविण्यात आला. या मोहिमेमध्ये पिंपळगाव शाखेतील अभियंता,जनमित्र,बाह्यस्रोत कर्मचारी,यंत्रचालक व बिलिंग विभाग यांचा उस्फुर्त सहभाग लाभल्याचे एडके यांनी सांगितले.पिंपळगाव शाखा कार्यालया अंतर्गत सर्व गावातील वीज बिल भरलेल्या सर्व ग्राहकांचे महावितरणकडून कनिष्ठ अभियंता पारगाव विभाग पी.पिसाळ शाखा अभियंता पिंपळगाव (अतिरिक्त भार) यांनी आभार मानले आहेत.

    जनमित्र शीतल म्हस्के,कृष्णा ढगे,भाऊ नवले,सुरज शिंदे,संदीप सोनवणे,शिवाजी शिंदे,सागर थोरात,बापुसाहेब दिवेकर,आदीनी वसुलीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.