पुणे महंमदवाडीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

शिंदे या ग्राहकाची १ मार्च २०२०पासून १९ हजार रुपये विजबिलाची थकबाकी होती. त्यांना विजबिल भरण्याबाबत सूचना केली होती, त्यानंतर कर्मचारी त्यांच्याकडे वीजबिल वसुलीसाठी गेले. त्यावेळी तेथे त्यांचा मुलगा सचिन शिंदे आला, त्याने आरडाओरड करीत दमदाटी करत, त्याने घराच्या प्रवेशद्वारापासून शिवीगाळ करीत, हातात बांबू घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून येत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

    पुणे: थक्कीत वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना महंमदवाडीमध्ये (स.नं.५९ , तरवडेवस्ती) येथे घडली आहे. याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी अविनाश भोसले यांनी महंमदवाडी पोलीस चौकीमध्ये सचिन शिंदे यांच्या विरोधात मारहाण, दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी सचिन शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
    शिंदे या ग्राहकाची १ मार्च २०२०पासून १९ हजार रुपये विजबिलाची थकबाकी होती. त्यांना विजबिल भरण्याबाबत सूचना केली होती, त्यानंतर कर्मचारी त्यांच्याकडे वीजबिल वसुलीसाठी गेले. त्यावेळी तेथे त्यांचा मुलगा सचिन शिंदे आला, त्याने आरडाओरड करीत दमदाटी करत, त्याने घराच्या प्रवेशद्वारापासून शिवीगाळ करीत, हातात बांबू घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून येत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप म्हणाले की, वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने वापरलेल्या विजेचे बिल भरणे आवश्यक आहे. मागिल वर्षभरापासून अनेकांकडे विजेची थकित बिले आहेत, विजेचे बिल वेळेत भरा, मनस्ताप टाळा असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काही ठिकाणी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीजबिल वसुली करण्यात अडथळे येत असल्याने यापुढे जर ग्राहकांकडून वीज वितरण कटिंग ला गेलेल्या कर्मचाऱ्यांवर ती जर मारहाण होत असेल तर याची गायक केली जाणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीसाठी सहकार्य करणे महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.