आंबेगाव तालुक्यात विजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणची झुंज ..

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यामध्ये निसर्गचक्री वादळाने खांब पडणे, तारा तुटणे आदिंमुळे विजयंत्रणेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ही नैसर्गिक प्रतिकुल परिस्थिती उध्दभवल्यानंतर आता मौसमी पाऊस व त्यातच कोरोनाचे असलेले संकट अशा विविध अडचणींना सामोरे जात विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंते व जनमित्र अविश्रांत दुरूस्ती कामे करत टप्प्याटप्प्याने ग्राहकांचा विजपुरवठा सुरळीत करत आहे.

तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे डोंगद-यांमध्ये व इतर ठिकाणी विजयंत्रणेचे नुकसान झाले आहे. विजखांब, रोहित्र जमीनदोस्त झालेले दिसुन आले. वादळाच्यावेळी सावधगिरीचा उपाय म्हणून विजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र विदयुत वितरण कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. प्रथमच इतक्या वेगाने आलेल्या वादळामुळे विजयंत्रणेची मोठी पडझड झाली. सदयस्थितीत मुख्य गावांचा विजपुरवठा पूर्ववत झाला आहे. उर्वरीत छोटी गावे, वाडया-वस्त्या व पांडयांचा विजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरूस्तीची कामे वेगाने सुरू आहे. तर बहुतेक कामे पुर्ण झाली आहे. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंते, जनमित्र व कंत्राटदारांचे कर्मचारी साधनसामग्रीसह सध्या दुरूस्ती कामे करीत आहेत. विशेष म्हणजे घोडेगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. घातुळे व सहायक अभियंते जनमित्रांच्या बरोबरीने काम करत आहे.     
 
विदयुत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ट्रॅक्टर, जेसीबी, पिकअप आदिंचा वापर होत आहे. निसर्ग बाधित गावांमध्ये लोखंडी व सिमेंटचे खांब, रोहित्र, विजतार, डिस्क व पीन इन्सुलेटर पाठविण्यात आले आहे. अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार दररोज जिल्हयातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन दुरूस्ती कामात सक्रिय होऊन विजपुरवठा पुर्ववत चालु होण्याकामी आवश्यक त्या सुचना संबंधितांना करत आहे. मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे, घोडेगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. घातुळे, मंचर विभागाचे उपकार्यकारी अभियंता जयंत गेटमे यांच्यासह तालुक्यातील सहायक अभियंते, जनमित्र सर्व प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाऊन युध्दपातळीवर करत असलेली दुरूस्ती कामे व मेहनत निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.