प्रि-वेडींग फोटोशूट करायचंय?; मग एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये या

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाऊनपासून परिसर, खोल्या, उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना किमान पुढील दोन वर्षे करण्यात येणार आहेत. कोयना लेकमधून धरणाचे नयनरम्य दृश्‍य आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे.

पुणे.  लवकरच लग्नाचा सिझन सुरु होतोय  डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुटसाठी फोटोग्राफर आणि जोडपे चांगले लोकेशन शोधात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आयटी कंपन्यांसह अनेक उद्योग-व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमवर भर दिला. बहुतांश आयटीसह काही कंपन्यांतील अधिकारी-कर्मचारी घरीच बसून कामकाज करीत आहेत. मात्र, तेच कार्यालयीन कामकाज निसर्गाच्या सानिध्यात बसून केल्यास कार्यालयीन कामकाजासोबत निसर्गाचाही सुखद अनुभव घेता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून लॉकडाऊनपासून परिसर, खोल्या, उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासांसाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना किमान पुढील दोन वर्षे करण्यात येणार आहेत. कोयना लेकमधून धरणाचे नयनरम्य दृश्‍य आणि निसर्गसौंदर्य अनुभवता येणार आहे. याठिकाणी २२ कॉटेज रूम्स, बंगलो, फॅमिली रुम्स असून, रुचकर भोजनासाठी उपहारगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. लोणावळा कार्ला, महाबळेश्‍वर, माळशेज घाट, पानशेत, माथेरान आणि भीमाशंकरसोबत कोयनानगर येथील पर्यटक निवासस्थानांमध्ये वर्क फ्रॉम नेचरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वच्छ, रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या परिसरातील पर्यटक निवासस्थानांमध्ये खाद्यपदार्थाचीही मेजवानी असेल. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महामंडळ पर्यटकांची आतुरतेने वाट पहात आहे.