मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कोटीचे रस्त्याचे काम लाखात पूर्ण ?

-अभियंताकडून ठेकेदाराची पाठराखण ; वरवंड येथील प्रकार दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड हद्दीतील सातपुतेमळा ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्याच्या विकास कामात संबंधित ठेकेदारानी हलगर्जीपणा केला

-अभियंताकडून ठेकेदाराची पाठराखण ; वरवंड येथील प्रकार

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड हद्दीतील सातपुतेमळा ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्याच्या विकास कामात संबंधित ठेकेदारानी हलगर्जीपणा केला असून रस्त्याच्या कामाची मुदत संपली असतानाही अनेक कामे अपूर्ण असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत, संबंधित ठेकेदार यांना शासकीय अभियंता आश्रय देत असल्याचा संशय  निर्माण झाला आहे. 

    वरवंड येथील राष्ट्रीय महामार्ग ते सातपुतेमळामधील दोन हजार तीनशे पन्नास मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन १ कोटी २० लाख ८१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता, यामध्ये पाच पूल (मोऱ्या) चे नवीन बांधकामासहित रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले होते, यावेळी मार्च २०१९ ते जानेवारी २०२० या नऊ महिन्याच्या कालावधीत रस्ता डांबरीकरणाचे काम केडगाव येथील मे. कोकरे ब्रदर्स या कंपनीला देण्यात आले होते, पुढील पाच वर्षे रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार यांना ६ लाख ३८ हजार रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे,

  वरवंड येथील सातपुतेमळा येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची मुदत जानेवारी २०२० महिन्यातच संपली असून रस्त्याची अनेक कामे अपूर्ण आहेत, निविदा प्रमाणे रस्त्याच्या डांबरीकरणात कारपेटची जाडी २० मी.मी. असून प्रत्यक्षात मात्र कारपेटची जाडीत मोठया प्रमाणात घोळ केला असल्याचे सज्ञान नागरिक बोलत आहेत, तसेच संबंधित शासकीय अभियंता यांना हाताशी धरून रस्त्याच्या वरील डांबराचा सिराकोटचा स्थर गायब केला आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी व्यवस्थापनासाठी गटरचे काम करणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदारांनी गटरचे कामच केले नाही, रस्त्याच्या दोन्ही बाजूस मुरूमाच्या प्रत्येकी तीन फुटाच्या साईट पट्टांचे काम अध्याप केले नाही, तसेच लहान दोनशे मीटर व प्रत्येक हजार मीटरवर क्रमांकांचे अंतरदर्शक पांढऱ्या रंगाचे नंबरी (स्टोन) लावले नसून संबंधित रस्त्याची अनेक कामे अपूर्ण आहे,

    या रस्त्याच्या कामाची मुदत संपली असताना ही रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने संबंधित अभियंता काय काम करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, संबंधित अभियंताकडे रस्त्याच्या तक्रारी केल्या असता ग्रामस्थांच्या तक्रारींना दाद देत नसल्याचे दिसून येत आहे, अभियंता मुुंडे हे लॉकडाऊन असल्याने रस्त्याचे काम अपूर्ण असल्याची चुकीची माहिती ग्रामस्थांना देत असून ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी सांगतो असे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, संबंधित अभियंता यांना रस्त्याच्या दर्जा संदर्भात काळजी नसून ठेकेदारांचे बिल काढण्याची काळजी असल्याची चर्चा परिसरात जोमात चालू आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक विभागाचे अभियंता अभिजित मुंडे यांनी या प्रकरणी संबंधित ठेकेदाराच्या खंबीर व उघडपणे पाठ राखण करत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत, तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक विभागाचे मुख्य अभियंता कविता देवरे यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी चार दिवसांपासून संपर्क झाला नाही,

     दरम्यान, कोटीमधील रस्त्याचे काम काही लाखातच पूर्ण केले असल्याने या प्रकरणाची वरिष्ठांनी योग्य दखल घेऊन व अभियंता यांच्या देखभालची व संपूर्ण रस्त्याची, पाच पुलाची तपासणी करावी व संबंधित ठेकेदार यांना या प्रकरणी जाब विचारून लेखी सूचना देऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.