mumbai-pune accidet

शनिवारी सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळ्याजवळ हा अपघात घडला आहे. हा ट्रक साखरेची पोती घेऊन कर्नाटकहून मुंबईकडे येत होता. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे भरधाव वेगात ट्रक पढे जात होता. त्यामुळे ट्रकवर ताबा मिळविण्यासाठी चालकाने ट्रकवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. हा ट्रक खंडाळा येथील अवजड वळणावर असलेल्या अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. तेव्हा वळणावर महामार्गाच्या बाजूला उलटला.

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune expressway )  अमृतांजन पुलाजवळ साखरेनं भरलेला ट्रक उलटला आहे. यामुळे एकाचा जागीच मृत्यू (One killed after truck overturns) झाला आहे तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. साखरेनं भरलेल्या या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

शनिवारी सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळ्याजवळ हा अपघात घडला आहे. हा ट्रक साखरेची पोती घेऊन कर्नाटकहून मुंबईकडे येत होता. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे भरधाव वेगात ट्रक पढे जात होता. त्यामुळे ट्रकवर ताबा मिळविण्यासाठी चालकाने ट्रकवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. हा ट्रक खंडाळा येथील अवजड वळणावर असलेल्या अमृतांजन पुलाजवळ पोहोचला. तेव्हा वळणावर महामार्गाच्या बाजूला उलटला.

ट्रक उलटल्या बरोबर काही जण बाहेर फेकले गेले. यामध्ये एक जण साखरेच्या पोत्याखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा जखमी झाला आहे. हा ट्रक रस्त्याच्या एका बाजूला पलटल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. तसेच घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्ती आणि मयत व्यक्तीस रुग्णालयात नेण्यात आले आहे.