पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार ‘संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान’

पिंपरी : माझे कुटुंब माझी जवाबदारी अभियानानंतर कुष्ठरोग व क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत 1 ते 16 डिसेंबर दरम्यान ‘संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान’ राबविण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आ

पिंपरी : माझे कुटुंब माझी जवाबदारी अभियानानंतर कुष्ठरोग व क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत १ ते १६ डिसेंबर दरम्यान ‘संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान’ राबविण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

राज्यातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यासंदर्भात सविस्तर माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी जाहीर केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने रुग्णांच्या निदानासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. दोन्ही आजारांचे प्रमाण खूपच भयानक असून रुग्ण उपचारापासून वंचित राहिल्यास त्याच्या संपर्कातील निरोगी लोकांना याची बाधा होऊ शकते. त्यानंतर संसर्गाची साखळी अखंडीत राहण्याची भिती आहे.

यावर मात करण्यासाठी शहरातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान करण्यासाठी औषधोपचार सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. कमीत कमी कालावधीत असे रुग्ण शोधून काढण्यासाठी राज्य सरकारने सूचना केल्या आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत १ ते १६ डिसेंबर कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन शहरातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. अंजली ढोणे, कुष्ठरोग अधिकारी डॉ. साबळे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा कार्यकर्ती व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेतले आहे. या सर्वेक्षण अभियानाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.