संतपीठामध्ये शाळा सुरू करण्यासाठी महापालिका तीन लाख रूपये देणार

या लेखाशिर्षावरून शाळेसाठीचा खर्च करता येणार आहे. त्यानुसार, संतपीठाच्या बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी शाखेच्या खात्यात तीन लाख रूपये जमा करण्यात येणार आहेत.

    पिंपरी: महापालिकेच्यावतीने चिखली येथे संतपीठाची उभारणी करण्यात येत आहे. संतपीठाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली या संतपीठाचे कामकाज सुरू आहे. त्यासाठी तरतुद महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाकडे आहे. या संतपीठामध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहे.

    या शाळेसाठी तसेच इतर किरकोळ खर्चाकरिता तीन लाख रूपये जमा करण्याबाबत संतपीठ संचालक मंडळाने सुचविले आहे. सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात ‘चिखली टाळगाव येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ या लेखाशिर्षावर ४० लाख रूपये तरतुद करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत ही तरतुद काहीच खर्च झालेली नाही. या लेखाशिर्षावरून शाळेसाठीचा खर्च करता येणार आहे. त्यानुसार, संतपीठाच्या बँक ऑफ बडोदाच्या पिंपरी शाखेच्या खात्यात तीन लाख रूपये जमा करण्यात येणार आहेत.