पार्थिवावर अंत्यसंस्कारसाठी महापालिका करणार ६ हजार रुपये खर्च…

    पिंपरी : कोरोनाबाधित मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी महापालिका पारंपरिक पद्धतीचा अवलंब करणार असून, गावकऱ्यांचा आधार घेणार आहे. त्यासाठी प्रति पार्थिव सहा हजार रुपयांच्या खर्चाचा भार महापालिका उचलणार आहे
    कोरोनाबाधित व्यक्तींवर पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी लावूâड आणि सरणाची उपलब्धता महापालिकेमार्पâत करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. कोरोना बाधित मृत व्यक्तींच्या पार्थिवावर महापालिकेच्या विद्युत आणि गॅस दाहिनीमध्ये अंत्यविधी करण्यात येत आहेत. तथापि, कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यू संख्येमुळे निगडी, सांगवी, भोसरी, लिंकरोड, चिंचवड आणि नेहरुनगर येथील पारंपारिक स्मशानभूमींमध्ये कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

    दरम्यान कोरोना बाधित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले लाकूड आणि सरणाची उपलब्धता करण्यासाठी स्मशानभूमींकरिता काळजीवाहू म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थांमार्पâतच लाकूड आणि सरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च हा त्यांच्या मासिक बिलामध्ये अदा करण्यात येणार आहे. एका पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यासाठी साधारपणे ९ ते १० मण लाकूड तसेच १५० गोवNयांची आवश्यकता असते. लाकडाचा दर हा ४५० प्रति मण इतका असून एका गोवरीची विंâमत ८ ते १० रुपये आहे. १० मण लाकडाकरिता ४ हजार ५०० आणि १५० गोवऱ्यांकरिता अंदाजे १ हजार ५०० रुपये असे एकूण ६ हजार इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

    तसेचं निगडी स्मशानभूमीसाठी मेसर्स शुभम उद्योग , सांगवी स्मशानभूमीसाठी मेसर्स महालक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, भोसरी स्मशानभूमीसाठी मेसर्स शुभम उद्योग, लिंकरोड – चिंचवड स्मशानभूमीसाठी मेसर्स जयभवानी एंटरप्रायझेस, नेहरुनगर स्मशानभूमीसाठी मेसर्स जयभवानी एंटरप्रायझेस या काळजीवाहक संस्थांकडे अंत्यविधीची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. या सर्व स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकूड, सरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी या काळजीवाहू संस्थांना प्रती मृतदेह ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.