प्रतिनिधिक फोटो
प्रतिनिधिक फोटो

पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना पूर आल्याने पाणी साचणारी ठिकाणे, वस्त्या ,धोकादायक भिंती, घरे, इमारती आदी ठिकाणांवर लक्ष ठेवले आहे.नागरिकांनीही अशा ठिकाणांची माहिती द्यावीत.गटार, नाले, ओढे यांवर अतिक्रमण करुन दुकान घरे बांधली असल्यास स्वत:हून काढावीत, अन्यथा महापालिकेमार्फत कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

    पिंपरी: पावसाळयात पुराची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले. रस्त्यावर पाणी साठू नये, यासाठी क्षेत्रिय स्तरावर आरोग्य विभागामार्फत उघडी गटारे, सांडपाणी वाहिन्या, नाले, ओढे, भुयारी मार्ग यांची साफसफाई सुरु आहे.घनकचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित होण्यासाठी नियोजन सुरु आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कळविले आहे. पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना पूर आल्याने पाणी साचणारी ठिकाणे, वस्त्या ,धोकादायक भिंती, घरे, इमारती आदी ठिकाणांवर लक्ष ठेवले आहे.नागरिकांनीही अशा ठिकाणांची माहिती द्यावीत.गटार, नाले, ओढे यांवर अतिक्रमण करुन दुकान घरे बांधली असल्यास स्वत:हून काढावीत, अन्यथा महापालिकेमार्फत कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही आयुक्त पाटील यांनी दिला आहे.

    हेल्पलाइन क्रमांक
    व्हॉट्स अ‍ॅप : ९९२२५०१४५०
    सारथी : ८८८८००६६६६
    पूर नियंत्रण कक्ष : ०२०-६७३३११, २८३३११११
    ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३४०५०, ९९२२५०१४५४, ९९२२५०१४५३
    ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय : ९९२२५०१४५५, ९९२२५०१४५६
    ‘क ‘ क्षेत्रीय कार्यालय : ०२० – ६८३३४५५०, ९९२२५०१४५७, ९९२२५०१४५८
    ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय : ९९२२५०१४५९, ९९२२५०१४६०
    ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय : ८६०५७२२७७७, ८६०५८२२७७७
    ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०-६८३३५३५०, ८६०५४२२८८८
    ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०- ६८३३५५५०, ७८८७८६८५५५, ७८८७८७९५५५
    ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय : ०२०- ६८३३५७५०, ९१३००५०६६६
    अग्निशमन विभाग : ०२०-२७४२३३३३, ०२० – २७४२२४०५, ९९२२५०१४७५
    आपत्ती व्यवस्थापन : ०२०- २७६७३३११५८, ८८८८८४४२१०