
जेजुरी :येथील एका बारमध्ये झालेल्या किरकोळ वादातून प्रसाद मल्हारी दळवी (वय ४१,रा .जेजुरी )याचा रात्री डोक्यात दगड घालून खून करण्यात आला .काल रात्री साडेबाराच्या सुमारास होळकर तलावावर ही घटना घडली
जेजुरी :येथील एका बारमध्ये झालेल्या किरकोळ वादातून प्रसाद मल्हारी दळवी (वय ४१,रा .जेजुरी )याचा रात्री डोक्यात दगड घालून खून करण्यात आला .काल रात्री साडेबाराच्या सुमारास होळकर तलावावर ही घटना घडली .जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या खून प्रकरणाबाबत अमृत उर्फ अमर मच्छिंद्र घोरपडे (रा .जेजुरी ,जि पुणे) व निरंजन उर्फ गोट्या प्रदीप पवार (रा .पिंपरी ता पुरंदर जि पुणे )या दोघांविरुद्ध भा .द .वि. ३०२ ,२०, ३४ प्रमाणे जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना रात्री होळकर तलावांमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन स्थानिक तरुण बाळू खोमणे व बबलू मुदलियार यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला, प्रसाद दळवी याच्या डोक्यावर व तोंडावर जखमा होत्या .रात्री पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता ते फरार झाले होते ,खुनाचा तपास लावण्यात पोलीस यशस्वी झाले ,दारू पिल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून रात्री होळकर तलावावर प्रसादला नेऊन त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले .या दोघांनी त्याचा खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी तलावात फेकून दिला होता ,प्रसाद याचे जेजुरीत सलूनचे दुकान आहे, घटनास्थळी एक दुचाकी व रक्ताने भरलेला दगड पोलिसांनी जप्त केला.