प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सौरभ वाघमारे याने आंबेगाव पठार येथे एप्रिल महिन्यात संग्राम लेकावळे याचा खून केला होता. त्यानंतर सौरभ हा आंबेगाव पठार सोडून जनता वसाहतीत राहायला आला होता. संग्राम लेकावळे याचा मामा वृषथ रेणुसे याने इतरांच्या मदतीने वाघमारे याच्या खुनाचा कट रचला. सौरभ याला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले. त्यानुसार सौरभ हा बनसोडे याला घेऊन पर्वती पायथा येथे आला.

    पुणे : आंबेगाव पठार येथे झालेल्या आपल्या भाच्याचा खुनाचा बदला घेण्यासाठी मामाने एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. पर्वती पायथा येथे रविवारी रात्री झालेल्या खुनाचे प्रकरण दत्तवाडी पोलिसांनी उघडकीस आणले असून त्यात सहा जणांना अटक केली आहे. सौरभ विनोद वीर ऊर्फ मोन्या, अक्षय विनोद वीर, वृषभ दत्तात्रय रेणुसे, सचिन ऊर्फ दादा पवार, आकाश नावाडे, स्वामी कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सौरभ वाघमारे (वय १७, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी दादासो मारुती बनसोडे (वय २३, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

    सौरभ वाघमारे याने आंबेगाव पठार येथे एप्रिल महिन्यात संग्राम लेकावळे याचा खून केला होता. त्यानंतर सौरभ हा आंबेगाव पठार सोडून जनता वसाहतीत राहायला आला होता. संग्राम लेकावळे याचा मामा वृषथ रेणुसे याने इतरांच्या मदतीने वाघमारे याच्या खुनाचा कट रचला. सौरभ याला जुना मोबाईल विक्री करण्याचा बहाणा करुन रविवारी रात्री पर्वती पायथा येथे बोलावून घेतले. त्यानुसार सौरभ हा बनसोडे याला घेऊन पर्वती पायथा येथे आला. तो पायर्‍यांवर थांबला असताना तेथे दबा धरुन बसलेले सौरभ वीर, अक्षय वीर व वृषभ रेणुसे यांनी त्यांच्याकडील कोयत्याने सौरभ वाघमारे याच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर वार केले. इतरांनी सौरभला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बनसोडे हा त्याला वाचविण्यासाठी सौरभला मारु नका, तो मरेल, असे ओरडत असताना सौरभ वीर याने त्याच्या पाठीवर कोयत्याने वार केला तर, स्वामी कांबळे याने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.