Knife-attack
प्रतीकात्मक फोटो

दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर एकाने धारदार चाकूने वार करून तरूणाचा खून (Murder ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल शुक्रवारी आठ वाजण्याच्या सुमारास लष्कर पोलीस स्टेशनच्या (Police Station) हद्दीतील कॅम्प (Camp) परिसरात घडली.

पुणे : दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर एकाने धारदार चाकूने वार करून तरूणाचा खून (Murder ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल शुक्रवारी आठ वाजण्याच्या सुमारास लष्कर पोलीस स्टेशनच्या (Police Station) हद्दीतील कॅम्प (Camp) परिसरात घडली. त्यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उबेद बाबु कुरेशी असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वयवर्ष २८ होते. उबेद कुरेशी हा बाबाजान दर्गा एज्युकेशन स्कुलच्या समोर कबाब पावची गाडी लावतो. नबील शब्बीर बेलीम आणि उबेद हे दोघे एकमेकांचे परिचयाचे आहेत. उबेद हा नेहमी शिवीगाळ करीत असे. त्यामुळे नबील हा त्याच्यावर रागावला होता. नेहमीप्रमाणे उबेद याने आज नबील याला शिवीगाळ केली.

त्यांच्यात चेष्टामस्करी सुरु असतानाच रागाच्या भरात नबील याने उबेद याच्या छातीमध्ये चाकू मारला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी नबील आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.