जुन्या भांडणाच्या वादातून धारदार शस्त्राने मित्राची हत्या

आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पंकज याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे.

    पिंपरी: जुन्या भांडणातून थेरगाव येथे तिघांनी मिळून एका तरुणावर खुनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्या घटनेतील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पंकज धोत्रे (रा. थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव गायकवाड, प्रथमेश शिंदे आणि मंथन चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज धोत्रे आणि आरोपी याच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे आरोपी मागील दोन-तीन दिवसांपासून पंकज याला शोधत होते. रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास पंकज थेरगाव येथील सोळा नंबर बसस्टॉप जवळ दिसला.