A box containing the body of a young man found in the creek; Murder of a young man in an immoral relationship

भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पोटात चाकू खूपसून पत्नीचा खून केल्याची घटना पुण्यातील लोणीकंद येथे घडली आहे.

    पुणे : भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पोटात चाकू खूपसून पत्नीचा खून केल्याची घटना पुण्यातील लोणीकंद येथे घडली आहे. पोलीसांना माहिती मिळताच पसार झालेल्या पतीला शोध घेऊन अटक केली आहे. भल्या पहाटे ही घटना घडल्याने लेबर कॅम्पमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

    अनु राजु मिर्झा (वय २८) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती राजू पुनाराम मिर्झा (वय ३०) याला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राजेश मिर्झा यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा कुटुंबीय मूळचे छत्तीसगढ येथील आहे. पुण्यात ते बांधकाम इमारतीवर लेबरचे काम करतात. ते लोणीकंद येथील वाघोली गावच्या बी. जे. एस. कॉलेज समोर मॅजेॉस्टिक सोसायटीचे काम सुरू आहे. त्याठिकाणी लेबर कॅम्पवर मिर्झा हे राहत होते. त्याचठिकाणी काम व तेथेच राहत असत. दरम्यान, अनुही पती राजु याचा भाऊ व अनु यांचा दीर याच्या कुटुंबासोबत राहत होती. तर, त्याच्याशी बोलत असे. त्यामुळे त्याला संशय येत होता.

    त्याने आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अनु झोपलेल्या खोलीजवळ आला. त्याने अनुला आवाज देऊन बाहेर बोलावले. तसेच, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत वाद घातला. तसेच, तु माझ्या भावासोबत बोलतेस तसेच, त्यांच्या कुटुंबासोबत राहतेस, असे म्हणत प्लास्टिकच्या पिशवीत आणलेला चाकूने पोटात सपासप वार करून खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. पोलीसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र तटकरे हे करत आहेत.