खडकी रेल्वे स्थानक परिसरात एकाचा खून ; अज्ञातावर गुन्हा दाखल

, खडकी रेल्वे स्थानकच्या समोर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याच्या डोक्यात व तसेच कपाळावर आणि शरीरावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : खडकी रेल्वे स्थानक परिसरात एकाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. आहेरमजान सय्यद (वय ३५ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक अनिल शेलार यानी तक्रार दिली आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी रेल्वे स्थानकच्या समोर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याच्या डोक्यात व तसेच कपाळावर आणि शरीरावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खुनाचे कारण व हल्लेखोर यांचा अद्याप तरी थांगपत्ता लागलेला नाही. अधिक तपास खडकीपोलीस करत आहेत.