सायबर हल्ला प्रकरणातील गूढ वाढले- टेक महिंद्राचा १२ टक्के पार्टनर असताना मुख्य भागीदार कशी, ५० टक्के पार्टनर असलेली क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीची जबाबदारी काय?- सिमा सावळे

क्रिस्टल कंपनीकडे सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रकल्पाचे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, मॅनपॉवर रिसोर्स, टेक्निकल डायरेक्शन, पूर्ण आढावा तसेच व्हेंडर कोऑरडिनेशन अशी सर्व महत्वाची जबबाबदारी क्स्टिल कंपनीकडे आहे. याचाच अर्थ सायबर हल्ला झाला त्याबाबत पुरेशी खबरदारी घेण्याची जबाबदारीसुध्दा क्रिस्टल कंपनीकडेच होती. प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यात अगदी पहिल्या आठवड्यापासून सायबर चोरांनी रेकी केली आणि सिस्टममध्ये वारंवार ये-जा केली. कंपनीच्या रेकॉर्डला तशी नोंद आहे. सायबर हल्ला २६ फेब्रुवारीला प्रत्यक्षात झाला, पण तत्पूर्वी महिनाभरापासून हल्लेखोरांनी सिस्टमध्ये आत-बाहेर सुरू केले होते. अशाही परिस्थितीत क्रिस्टल कंपनीकडे जबाबदारी असताना त्यांना हे समजले कसे नाही, असा सवाल सिमा सावळे यांनी उपस्थित केला आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर अज्ञात व्यक्तीद्वारे रॅन्समवेअर हल्ला कऱण्यात आला. सायबर हल्ला २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झाला, मात्र महिनाभरापासून सायबर हल्लेखोर सिस्टममध्ये ये-जा करत होते तरीसुध्दा या कंपनीला कुठलाही तपास लागला नाही, याचे आश्चर्य वाटते. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे ४४० कोटी रुपयेंच्या या कामात खऱ्या अर्थाने मुख्य भागीदार (लीड पार्टनर) मेसर्स क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. असून टेक महिंद्रा कंपनी नाममात्र (१२ टक्के) भागीदार कशी असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. महत्वाचा भाग म्हणजे सायबर हल्ला आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही खऱ्या अर्थाने क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि कंपनीकडे असताना आजवर टेक महिंद्रा कंपनीच आरोपिच्या पिंजऱ्यात आहे, असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केला आहे. दरम्यान, मेसर्स क्रिस्टल कंपनीचे नाव आणि जबाबदारीही स्पष्ट झाल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात या विषयावर प्रदेश पातळीवर मोठा धुराळा उडण्याची दाट शक्यता आहे.

    स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामांच्या रितसर निविदा मागवून कंत्राट देण्यात आले होते. त्यात टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि. या भागीदार कंपन्यांना काम दिले. त्यातील टेक महिंद्रा ही कंपनी नामांकीत तसेच उच्च तंत्रज्ञानात खूप अद्यावत असल्याने त्यांचे काम पाहून कंत्राट निश्चित कऱण्यात आले. भागीदार कंपनीत लीड पार्टनर टेक महिंद्रा असूनही एकूण कामाच्या (४४० कोटी रुपये) अवघे सुमारे ५० कोटी रुपयेंचे काम (१२ टक्के) टेक महिंद्रा कंपनीकडे आहे. त्याशिवाय क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. कडे सुमारे २२० कोटी रुपये (५० टक्के) आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि. या कंपनीकडे १७५ कोटी रुपये (३८ टक्के) काम आहे. सर्वात कमी जबाबदारी टेक महिंद्रा कंपनीकडे असताना केवळ मुख्य भागीदार म्हणून सायबर हल्ल्याबाबतची तक्रार त्यांनी दाखल केली आहे, हे सर्वच थोडे विचित्र आणि संशयास्पद आहे, असे सिमा सावळे यांनी म्हटले आहे.

    क्रिस्टल कंपनीकडे सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रकल्पाचे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, मॅनपॉवर रिसोर्स, टेक्निकल डायरेक्शन, पूर्ण आढावा तसेच व्हेंडर कोऑरडिनेशन अशी सर्व महत्वाची जबबाबदारी क्स्टिल कंपनीकडे आहे. याचाच अर्थ सायबर हल्ला झाला त्याबाबत पुरेशी खबरदारी घेण्याची जबाबदारीसुध्दा क्रिस्टल कंपनीकडेच होती. प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यात अगदी पहिल्या आठवड्यापासून सायबर चोरांनी रेकी केली आणि सिस्टममध्ये वारंवार ये-जा केली. कंपनीच्या रेकॉर्डला तशी नोंद आहे. सायबर हल्ला २६ फेब्रुवारीला प्रत्यक्षात झाला, पण तत्पूर्वी महिनाभरापासून हल्लेखोरांनी सिस्टमध्ये आत-बाहेर सुरू केले होते. अशाही परिस्थितीत क्रिस्टल कंपनीकडे जबाबदारी असताना त्यांना हे समजले कसे नाही, असा सवाल सिमा सावळे यांनी उपस्थित केला आहे.

    स्मार्ट सिटी चे काम या भागीदार कंपन्यांना देताना टेक महिंद्राची पात्रता उच्च दर्जाची असल्यानेच काम देण्यात आले. प्रत्यक्षात भागीदारीत टेक महिंद्रा कंपनीचा शेअर अवघा १२ टक्के असताना त्याबाबत स्मार्ट सिटीचे सल्लागार आणि महापालिकेचे अधिकारी यांना समजले कसे नाही, की माहित असून त्यांनी सोयिसाठी दुर्लक्ष केले असे अनेक प्रश्न आता उभे ठाकले आहेत. कागदोपत्री टेक महिंद्रा लीट पार्टनर असताना क्रिस्टल कंपनीचा ५० टक्के वाटा कसा याबाबत कोणीही सल्लागार, स्मार्ट सिटी च्या अधिकाऱ्यांनी शंका उपस्थिती कशी केली नाही, याचेही गूढ आहे. कदाचीतय या कामात टेक महिंद्रा कंपनी लीड पार्टनर नसती तर र हे कंत्राट यांना मिळालेत नसते, अशीही शक्यता होती. लीड पार्टनरला किमान ५१ टक्के काम असाला हवे होते, मात्र त्यांचा सहभाग अवघा १२ टक्के कसा याबाबत महापालिका आधिकाऱ्यांनी कधीही विचारणा केल्याचे दिसत नाही, असेही सिमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले.

    केवळ राजकीय दबावापोटीच
    स्मार्ट सिटीच्या कामात केवळ राजकीय दबावापोटीच हे काम देण्यात आले, अशीही चर्चा आहे. मोठ मोठ्या व्यक्तींची नावे या कामात घेतली जात असल्याने अधिकारी गुळणी धरून बसले आहेत. स्मार्ट सिटीचे सल्लागार राजकीय दबावाखाली काम असून त्यांना तांत्रिक माहिती नसते, अशा परिस्थितीत अधिकारी आणि सल्लागार यांनी वस्तुस्थिती अवगत करून देणे गरजेचे होते. प्रत्येक वेळी स्मार्ट सिटी समिती (बोर्ड) मान्यता आहे, असे सांगून काम रेटून नेले आणि आता सर्व उघड होत चालल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.