‘नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू’; चंद्रकांत पाटलांची टीका

जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार हे हिमनगाचे टोक असल्याचा पुनर्रुच्चार केला. मी जे पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिले आहे. त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 वर्षांपूर्वीच दिलेल्या यादीचाही समावेश आहे.

  पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंजिनच खराब झाले असून, केवळ डबे बदलून चालणार नाही, अशी टीका केली हाेती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ‘ऊठसुठ काहीही आराेप करणारे पटाेले हे ‘महाराष्ट्राचा पप्पू’ आहेत. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सहकार मंत्रालय सुरू करण्याच्या विषयावर व्यक्त केलेल्या मतावर टीका करताना राऊत यांना सहकार क्षेत्रामधील काय कळते ? असा खाेचक प्रश्न करत त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

  महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील प्रश्नासंदर्भात पाटील यांनी या भागातील लाेकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते पत्रकार परीषदेत बाेलत हाेते. या महापाैर मुरलीधर माेहाेळ, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष याेगेश टिळेकर, प्रवक्ते संदीप खर्डेकर यावेळी उपस्थित हाेते.

  साखर कारखाना विक्रीसंदर्भातील पत्राचा उल्लेख करताना, पाटील यांनी जरंडेश्वर साखर कारखाना गैरव्यवहार हे हिमनगाचे टोक असल्याचा पुनर्रुच्चार केला.  मी जे पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिले आहे. त्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 वर्षांपूर्वीच दिलेल्या यादीचाही समावेश आहे. यादीत गडकरी यांच्या दाेन साखर कारखान्यांचा उल्लेख असला तरी त्या कारखान्यात काेणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा करीत पाटील यांनी गडकरी यांना क्लिन चीट दिली.

  11 गावांचा विकास आराखडा अद्याप मंजूर नाही

  पुणे, याआधी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांचा विकास आराखडा ( डिपी ) अद्याप मंजुर नाही. आता  नव्याने २३ गावे समाविष्ट करण्यामागे महाविकास आघाडी सरकारचा हेतु काय? हे कळायला मार्ग नाही. पण गावांकरीता मंजुर झालेला निधी अाता महापािलकेला मिळायला हवा. राज्य सरकारने देखील या गावांच्या िवकासाकरीता नऊ हजार काेटी रुपये द्यावेत अशी भुमिका चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली.

  विकास आराखड्यावरून राजकारण सुरु 

  गावे समाविष्ट केल्यानंतर या गावांच्या विकास आराखडा तयार करण्यावरून वाद निर्माण हाेण्याची शक्यता वर्तविली जात हाेती. महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी या गावांकरीता पीएमअारडीएने तयार केलेल्या िवकास अाराखडा कायम ठेवत, त्यावर कार्यवाही करण्याचे सुताेवाच केले हाेते. यासंदर्भात िवचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, ‘‘ या गावांचा िवकास अाराखडा करताना घाई करू नये. ही गावे महापािलकेत अाली असुन, त्यांचा िवकास अाराखडा हा महापािलकेनेच केला पाहिजे. ’’