तळेगाव ढमढेरेत राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पांढरी वस्ती येथील एका शेतामध्ये आढळून आलेल्या आणि आजारी असलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले असून सदर मोराला वनविभागाच्या अधिकाऱ्यां ताब्यात देण्यात आले असून मोराला पुणे येथील प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे.

 पक्षांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे प्राणीमित्रांचे आवाहन

शिक्रापूर  : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पांढरी वस्ती येथील एका शेतामध्ये आढळून आलेल्या आणि आजारी असलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले असून सदर मोराला वनविभागाच्या अधिकाऱ्यां ताब्यात देण्यात आले असून मोराला पुणे येथील प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पांढरीवस्ती येथे बाबासाहेब ज्ञानेश्वर भुजबळ यांच्या शेतामध्ये एक मोर निपचित पडलेला असल्याचे आढळून आले त्यांनतर ग्रामपंचायत सदस्य महेश किसनभाऊ भुजबळ यांनी महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे प्राणीमित्र शेरखान शेख यांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर शेरखान शेख यांनी वनविभागाच्या वनरक्षक अनिता होले, प्रवीण क्षीरसागर यांना फोन करून माहिती दिली देत शेरखान शेख यांनी भुजबळ यांच्या शेताजवळ जाऊन पाहणी केली असता त्यांना तेथे शेतात एक मोर शांत पडलेला दिसून आला. त्यांनतर शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनरक्षक अनिता होले यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्या मोराला ताब्यात घेतले. त्यांनतर शिरूर वनविभागाचे वनरक्षक अनिता होले, ऋषिकेश लाड, अभिजित सातपुते, वनमजूर आनंदा हरगुडे यांच्या ताब्यात त्या मोराला देण्यात आले. यावेळी शेरखान शेख, प्रवीण बामणे, संकेत भांबुर्डेकर, समीर शेख हे उपस्थित होते. यावेळी सदर मोराची प्रकुती स्थिर असून या आजारी मोराला शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनानुसार कात्रज पुणे येथील प्राणी संग्रहालयामध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे वनरक्षक ऋषिकेश लाड यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना सध्या उन्हाचे दिवस असून पशु पक्षांच्या अन्न पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण असल्यामुळे प्रत्येकाने पशु पक्षांना पाण्याची व्यवस्था करून घरावर पाणी ठेवावे असे आवाहन महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे प्राणीमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.