वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूकआंदोलन

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात प्रत्येकी २० रुपयांनी वाढ झाली आहे. पेट्रोलचा दर गेल्या वर्षी १० जूनला ८० रुपये १५ पैसे एवढा होता, तर डिझेलचा दर ६९.०७ रुपये होता. सोमवारी (३१ मे) पेट्रोलचा दर १००.१५ रुपये आणि डिझेलचा दर ९०.७१ रुपये आहे. म्हणजेच, पेट्रोल दरात २० रुपये आणि डिझेलच्या दरात २१.६४ रुपयाने वाढ झाली आहे.

    पुणे: आधीच कोरोना आणि त्यात वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे अर्थकारण पूर्णतः बिघडून गेले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून गेल्या सात वर्षात गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कोथरुड विधानसभा मतदारसंघच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कोथरुड-कर्वे पुतळा येथे मूक आंदोलन केले.

    पुण्यात ३१ मेला ओलांडला शंभर रुपयांचा टप्पा

    पुण्यामध्ये सोमवारी पेट्रोलच्या दरांनी शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. डिझेलचे दर नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे पुणेकरांच्या खिशावरील भार वाढल्याने महागाईत आणखी वाढ होण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात मुंबई आणि नागपूर या दोन शहरांतील पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे पोहोचले होते. त्यानंतर सोमवारी पुण्यातील पेट्रोलचे दरांनीही शंभरीचा टप्पा गाठला. सोमवारी पुण्यात पेट्रोलचा दर १०० रुपये १५ पैसे होता, तर प्रीमियम पेट्रोलचा दर (पॉवर, स्पीड) १०३.८३ रुपये होता. डिझेल प्रतिलिटर ९०.७१ रुपयांवर गेले.

    वर्षभरात २० रुपयांनी वाढ