राज्यमंत्री भरणे यांचा निषेध करणाऱ्या खुसपे विरोधात राष्ट्रवादी युवकचे जोडेमारो आंदोलन

इंदापूर तालुक्यातील ३६ हजार एकर जमीन आणि २८ गावांना उजनी धरणाच्या निर्मिती वेळी जलसमाधी मिळाली आहे, त्यामुळे उजनी धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचा हक्क आहे आणि आमच्या हक्काचे पाणी हे २२ गावांना मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले आहे म्हणून आकसापोटी खालच्या पातळीवर जाऊन कोणी बदनामी करणार असेल तर त्याला भविष्यात यापेक्षा तीव्र उत्तर दिले जाईल असे ॲड शुभम निंबाळकर यांनी सांगितले.

    भवानीनगर: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या अतुल खुसपे यांच्या प्रतिमेला जोडे मारत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

    आज बेलवाडी(ता.इंदापूर) येथे इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन करून खुसपे यांचा तीव्र निषेध केला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला म्हणून करमाळा येथे प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढणाऱ्या अतुल खूसपे याचा चांगला समाचार घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खुसपे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर,राष्ट्रवादी सोशल मीडिया चे उपाध्यक्ष करण काटे, काकासाहेब जाधव , दादा यादव, अभि यादव, माऊली काटे, पवन जामदार,अक्षय कदम,परशुराम सावंत, सुमित जगताप, सुरज कदम,धीरज निंबाळकर ,सौरभ कदम,सागर गायकवाड,ओंकार पवार, जावेद मुलाणी,अभिजित खुटाले, आकाश जामदार, गणेश मुळीक,अमित मुलाणी‌
    आदी उपस्थित होते.

    यावेळी इंदापूर तालुक्यातील ३६ हजार एकर जमीन आणि २८ गावांना उजनी धरणाच्या निर्मिती वेळी जलसमाधी मिळाली आहे, त्यामुळे उजनी धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचा हक्क आहे आणि आमच्या हक्काचे पाणी हे २२ गावांना मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले आहे म्हणून आकसापोटी खालच्या पातळीवर जाऊन कोणी बदनामी करणार असेल तर त्याला भविष्यात यापेक्षा तीव्र उत्तर दिले जाईल असे ॲड शुभम निंबाळकर यांनी सांगितले.