दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

साेहळ्यास बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मुख्य अतिथी म्हणून, खासदार गिरीष बापट यांची विशेष अतिथी म्हणून, महापाैर मुरलीधर माेहाेळ ,पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि बांधकाम व्यावसाियक युवराज ढमाले सन्मानिय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महेश नागरी मल्टीस्टेट काे-ऑपरेटीव्ह सहकारी साखर साेसायटीचे संस्थापक-सचीव मगराज राठी यांना जीवन गाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    पुणे: दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वीतांचा ‘नवराष्ट्र आदर्श पुरस्कार २०२०’ देऊन गाैरव केला जाणार आहे. पुणे येथील नवी पेठेतील एस. एम. जाेशी सभागृहात सकाळी १० वाजता हा पुरस्कार वितरण साेहळा दिमाखात साजरा हाेणार आहे.

    साेहळ्यास बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मुख्य अतिथी म्हणून, खासदार गिरीष बापट यांची विशेष अतिथी म्हणून, महापाैर मुरलीधर माेहाेळ ,पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि बांधकाम व्यावसाियक युवराज ढमाले सन्मानिय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महेश नागरी मल्टीस्टेट काे-ऑपरेटीव्ह सहकारी साखर साेसायटीचे संस्थापक-सचीव मगराज राठी यांना जीवन गाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    या साेहळ्यात वसुंधरा शिवदास उबाळे (आदर्श सरपंच : वाघाेली), सारीका किरण पवार (आदर्श महिला उद्याेजिका, वाघाेली), साेमनाथ हाेळकर (आदर्श उद्याेजक, पुणे ), अभिजित धनंजय पाटील (आदर्श उद्याेजक, पंढरपूर), दीपक काटे (आदर्श उद्याेजक, बारामती), सतिश दत्तात्रय चाेथवे (आदर्श उद्याेजक, नगर), प्रथमेश अनिल जवळेकर (आदर्श युवा उद्याेजक, राजगुरुनगर ), श्रीचंद आसवानी ( आदर्श बांधकाम उद्याेजक, पुणे ), राजेश शहा (आदर्श व्यापारी, पुणे), संजय ऊर्फ तात्या घुले (आदर्श कार्यक्षम नगरसेवक, पुणे महापािलका), बिरजू मांढरे (आदर्श नगरसेवक, बारामती नगरपालिका), विशाल तांबे (आदर्श नगरसेवक, पुणे महापािलका), संदीप बाळकृष्ण वाघेरे (आदर्श नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापािलका), वसंत वाघमारे (आदर्श पत्रकार, पुणे), अरविंद मेहता (आदर्श ज्येेष्ठ पत्रकार, दैनिक ऐक्य, सातारा), युवराज काची (आदर्श समाजसेवक, पुणे), लालासाहेब जाधव (आदर्श समाजसेवक, प्रकल्प संचालक, बार्टी), संजय सातव (आदर्श समाजसेवक, हडपसर), धनराज दिगंबर गवळी (आदर्श रियल समाजसेवक, आधार फाउंडेशन, हडपसर), पै. अशाेक न्हावले (आदर्श समाजभूषण, औताडे-हांडेवाडी), राजेश पाेंंगट (समाजरत्न, जीवनगाैरव), सचिन किसन मुंढे (आदर्श समाजरत्न), वरवंड ग्रामशिक्षण संस्था (आदर्श शिक्षण संस्था), डाॅ. नंदकुमार शिवाजी गाेडगे (आदर्श रुग्णालय ग्रामीण, श्री साईबाबा हाॅस्पिटल, तळेगाव दिघे),दि. बारामती सहकारी बॅंक लिमिटेड (आदर्श सहकारी बँक ), माळेगाव सहकारी साखर कारखाना (आदर्श सहकारी साखर कारखाना), मगराज राठी (जीवन गाैरव पुरस्कार) यांना गाैरविण्यात येणार आहे.