Navratra celebration at Yamai temple at Kanersar in Khed

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते चा जयघोष करीत कनेरसर (ता. खेड) येथील कुलस्वामिनी यमाई देवीच्या नवरात्र महोत्सवास सुरूवात झाली. गुरूवारी (दि. ७) सकाळी साडेनऊ वाजता खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सचिव व धर्मादाय आयुक्त विभागाच्या निरीक्षक रागिणी खडके यांनी घटस्थापना केली.

  पुणे : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते चा जयघोष करीत कनेरसर (ता. खेड) येथील कुलस्वामिनी यमाई देवीच्या नवरात्र महोत्सवास सुरूवात झाली. गुरूवारी (दि. ७) सकाळी साडेनऊ वाजता खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सचिव व धर्मादाय आयुक्त विभागाच्या निरीक्षक रागिणी खडके यांनी घटस्थापना केली.

  कनेरसर येथील कुलस्वामिनी यमाईदेवीचे मंदिरात नवरात्र महोत्सवात राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे मंदीर बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. मात्र आज राज्यभरातील मंदीरे दर्शनासाठी खुली केल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. भाविकांना शासन नियम व सोशल डिस्टन्स राखून दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  यावेळी स्वाधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा मोहिते, जेष्ठ विधीज्ञ अॅड. सुखदेव पानसरे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष अरूण चांभारे, पश्चिम भागाच्या नेत्या सुजाता पचपिंड, ट्रस्टचे माजी अध्यक्ष मोहन दौंडकर, माजी पंचायत समिती सदस्य सुदाम माशेरे, सरपंच सुनिता केदारी, युवा नेते मयुर मोहिते, जिल्हा महिला उपाध्यक्षा कांचन ढमाले, राजू राऊत आदी उपस्थित होते.

  मंदीरात गर्दी होऊ नये यासाठी खेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  यावेळी बोलताना आमदार मोहिते म्हणाले की, सरकारने मंदीरे बऱ्याच अवधीनंतर भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत. मात्र आपण सर्वांनी सोशल डिस्टन्सींगचॆ पालन केले पाहिजे व मास्क वापरले पाहिजे. तसेच शासनाने घातलेल्या सुचनांचे व निर्बंधांचे पालन केले पाहिजे.

  साबळेवाडी येथे अंबिकामाता मंदीरात घटस्थापना

  साबळेवाडी (ता.खेड) येथील अंबिका मातेच्या नवरात्र महोत्सवास सुरूवात झाली असुन गुरूवार (दि.७) रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे यांनी घटस्थापना केली.

  साबळेवाडी येथील कुलस्वामिनी अंबिकामाता मंदिरात नवरात्र महोत्सवात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे मंदीर बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. मात्र आज राज्यभरातील मंदीरे दर्शनासाठी खुली केल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. भाविकांना शासन नियम व सोशल डिस्टन्स राखून दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी शितल शेंडे, पंकज हरगुडे, चंद्रकांत काटकर, संतोष काटकर, बाळासाहेब काटकर, दत्तात्रय शेंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.