राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर; अभिजीत काकडे यांच्यासह इतरांना संधी

सतिश काकडेंच्या चिरजीवांना ‌संधी. विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांसह पाच विद्यमान संचालकांना पुन्हा ‌संधी. १६ नवीन‌ चेहऱ्यांना संधी

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Someshwar Sahakari Sakhar Karkhana Election) राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत श्री सोमेश्वर विकास पॅनलच्या सर्व २१ उमेदवारांची यादी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केली. या उमेदवारांमध्ये आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे विरोधक असलेले शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजीत काकडे यांना मुरूम-वाल्हा या गट क्रमांक एकमधून संधी देण्यात आली आहे.

  विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष शैलेंद्र रासकर यांच्यासह पाच विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, इतर सोळा नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. नवीन सोळा उमेदवारांमध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे व माजी संचालक आनंद कुमार होळकर यांचाही समावेश आहे. सोमेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती व पुरंदर या तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील काही गावांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील १५, पुरंदर तालुक्यातील ५ व खंडाळा तालुक्यातील एक अशाप्रकारे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असा विचार करून उमेदवारी देण्यात आली आहे.

  सोमेश्‍वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री सोमेश्वर विकास पॅनलमधून तब्बल ४७५ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि २) इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बारामती शहरातील राष्ट्रवादी भवन मध्ये घेतल्या. यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ठराविक वगळता अन्य नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्‍वर विकास पॅनलच्या सर्व 21 उमेदवारांची यादी पक्षाने आज जाहीर केली. यामध्ये सतीश काकडे यांचे चिरंजीव अभिजित काकडे यांचा समावेश आहे.

  विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेंद्र रासकर, सुनील नारायण भगत, लक्ष्‍मण गंगाराम गोफणे, शांताराम शिवाजी कापरे या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

  सर्व उमेदवारांची गटनिहाय नावे पुढीलप्रमाणे : 

  निंबूत-खंडाळा गट (गट क्र.१) : जितेंद्र नारायण निगडे (गुळूंचे,ता.पुरंदर), लक्ष्‍मण गंगाराम गोफणे(खंडोबाची वाडी,ता.पुरंदर), अभिजीत सतीशराव काकडे (निंबूत,ता.बारामती).

  मुरूम-वाल्हा गट (गट क्र.२) : पुरुषोत्तम रामराजे जगताप (वाणेवाडी,या.बारामती), राजवर्धन शिवाजीराव शिंदे (मुरुम,ता.बारामती), ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड (करंजेपुल,या.बारामती).

  होळ-मोरगाव गट (गट क्र ३) : आनंदकुमार शांताराम होळकर (सदोबाचीवाडी), शिवाजीराव द्वारकोजीराव राजेनिंबाळकर (वडगाव निंबाळकर,ता.बारामती), किसन दिनकर तांबे (तरडोली,ता बारामती).को-हाळे-सुपा(गट क्र ४): सुनील नारायण भगत (को-हाळे,ता.बारामती), रणजित नंदकुमार मोरे(थोपटेवाडी,ता.बारामती), हरिभाऊ महादेव भोंडवे (भोंडवेवाडी,ता.बारामती).

  मांडकी-जवळार्जुन गट (गट क्र ५) : विश्वास मारुती जगताप (मांडकी, ता.पुरंदर), बाळासाहेब ज्ञानदेव कामथे(खळद,ता.पुरंदर), शांताराम शिवाजी कापरे (नाझरे सुपे,ता.पुरंदर).

  अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी : प्रविण युवराज कांबळे (होळ,ता.बारामती), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी: शैलेंद्र पंढरीनाथ रासकर (खंडोबाची वाडी,ता.पुरंदर).

  भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रतिनिधी : अनंत विनायक तांबे (थेऊर,ता पुरंदर).

  महिला राखीव प्रतिनिधी : कमल शशिकांत पवार (भादवडे,ता.खंडाळा,जि.सातारा), प्रणिता मनोज खोमणे (को-हाळे खुर्द,ता.बारामती).

  ब वर्ग संस्था प्रतिनिधी : संग्राम तानाजी सोरटे (मगरवाडी, ता.पुरंदर). दरम्यान सोमवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.