राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरेंना  उपचारासाठी पुण्याला हलविले

रविराज सदाशिवराव तावरे पत्नी सोबत वडापाव घ्यायला आले असताना त्यांच्यावर सोमवारी (दि. ३१) सायंकाळी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यानंतर तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

    बारामती: माळेगाव येथे अज्ञाताच्या गोळीबारात जखमी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे (४०) यांना बुधवारी पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे,त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे. केवळ पुढील उपचारासाठी तावरे यांना पुण्याला हलविण्यात आल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रमेश भोईटे यांनी सांगितले.

    तावरे हे पत्नी सोबत वडापाव घ्यायला आले असताना त्यांच्यावर सोमवारी (दि. ३१) सायंकाळी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यानंतर तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

    गिरीराज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे हृदयशस्त्रक्रिया तज्ञ डॉ. रमेश चव्हाण, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. निती महाडिक, भुलतज्ञ डॉ संतोष घालमे, डॉ.अमर पवार, डॉ.संजय पुरंधरे,हृदयरोगतज्ञ डॉ.सनी शिंदे,डॉ.सुनील पवार, डॉ भास्कर जेधे, डॉ अजिंक्य निंबाळकर आदी डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी(दि १) मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास शस्त्रक्रिया करत तावरे यांच्या शरीरात घुसलेली गोेळी बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तावरे यांच्यावर गिरीराजच्या अतिदक्षता विभागात सुरु होते.

    याबाबत डॉ. भोईटे यांनी ‘तावरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाहि,त्यांची प्रकृती स्थिर आहे.नातेवाईकांच्या इच्छेनुसार पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलविण्यात आले आहे.