कोरोना बाधीताच्या नातेवाईकांचे अहवाल निगेटीव्ह

भोर : तालुक्यातील नेरे येथील कोरोना बाधीत व्यक्तींची तब्येत चांगली आहे.

 भोर तालुक्यातील नेरे येथील घटना

भोर : तालुक्यातील नेरे येथील कोरोना बाधीत व्यक्तींची तब्येत चांगली आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील दहा जणांचे तपासणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याचे तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे यांनी सांगीतले.त्यांना सध्या होमक्वारंटाईन मध्ये ठेवले असून ते प्रशासनाच्या निगराणीखाली आहेत. अजून वीस जणांची तपासणी झाली असून त्यांचे अहवाल अजून प्राप्त झाले नाहीत. बाधीताच्या संपर्कात आलेल्या गावांतील ७७ जणांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले. बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांनी गावांत भेट देउन परीस्थितीची पाहणी केली.