uday samant

कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक सत्र 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यावर राज्य सरकार विचार करीत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले.

    पुणे : कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक सत्र 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यावर राज्य सरकार विचार करीत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले.

    ज्यातील विद्यार्थी आणि पालक यांना महाविद्यालयाकडून होणार्‍या शुल्काच्या मागणीचा विचार करिता, त्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश खासगी संस्थासाठी एफआरए निर्णय घेणार आहेत. यासाठी विजय आचलायी हे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल असे उदय सामंत यांनी सांगीतले.

    यावेळी त्यांनी सीईटी परीक्षेवरही भाष्य केले. व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीईटी ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. मात्र जोपर्यंत बारावीचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीईटीचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले. यासोबतच पुढील आठवड्यात राज्यात 3074 पदांची भरती होणार आहे. या भरती संदर्भात येत्या दोन दिवसांत वित्त विभाग आणि अजित पवार निर्णय घेतील, अशी देखील सामंत यांनी दिली.