एमआयटी एडीटी विद्यापीठाच्यावेबिनारमध्ये डॉ. के. कस्तुरीरंगनयांचे प्रतिपादन लोणी काळभोर : करोना व्हायरसच्याप्रादुर्भावानंतर उच्च शिक्षणात अनेक बदल होत आहेत. याबदललेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्यावेबिनारमध्ये डॉ. के. कस्तुरीरंगनयांचे प्रतिपादन

लोणी काळभोर : करोना व्हायरसच्याप्रादुर्भावानंतर उच्च शिक्षणात अनेक बदल होत आहेत. याबदललेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून शिक्षण विभागानेबघितले पाहिजे. भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणातगुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या संदर्भात बहुआयामीशिक्षण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे. यामागेविद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करून भारतालाज्ञान महासत्ता बनविण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी शिक्षकांनीअधिक सर्जनशील होऊन वेगवेगळ्या विषयांवरील सखोलमाहिती विद्य़ार्थ्यांना प्रदान करावी लागेल, असे प्रतिपादनभारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्त्रो) माजी अध्यक्षआणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ च्या मसुदा समितीचेअध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांनी केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजीविद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे आयोजित”उच्च शिक्षणातील बदलत्या प्रतिमानांची शक्यता आणिआव्हाने” या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रमुख वक्तेम्हणून ते बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचेसंस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, एमआयटीएडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनीयात सहभाग घेतला.

डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले, भारत सरकार विद्यार्थी केंद्रीतशैक्षणिक धोरण आखत आहे. यात विद्यार्थ्यांचासर्वसमावेशक (व्हॉलिस्टिक) विकास साधण्याचा हेतू आहे.सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे आव्हान असलेतरी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून समग्र विकाससाधता येईल. उच्च शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातसमतोल राखावा लागेल. देशातील ९०० हून अधिकविद्यापीठांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासह संशोधनाला महत्वद्यावे. त्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. २०३०पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात बहुआयामी उच्च शिक्षण देणाऱ्यासंस्था उभ्या राहतील. त्यातून विद्यार्थ्यांचा समग्र विकासआणि उदारमतवादी शिक्षणास प्रोत्साहन देण्यात येईल.भविष्यात शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणार असूनआंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचे आव्हान असणार आहे.त्यानुसार विद्यापीठांनी अभ्यासक्रमात बदल करून घ्यावालागेल. व्यावसायिक शिक्षणात विद्यार्थांचा सहभागवाढविण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचाप्रसार, शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाची संधीवाढविण्यास भरपूर वाव आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, आगामी काळातनवीन शैक्षणिक धोरणाचा महत्वाचा रोल असणार आहे.समग्र शांतता प्रिय शिक्षण प्रणाली उभी करावी लागेल. राष्ट्रीयशैक्षणिक धोरणाद्वारे शिक्षण संस्थांना मार्ग दाखविण्याचे कार्यहोईल. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत विद्यार्थीकेंद्रीत शिक्षण आणि समग्र विकासाला महत्व आहे.मुल्यात्मक शिक्षण प्रणाली निर्माण करून विकासात्मकशिक्षण देण्याची गरज आहे.   

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिकधोरणासाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली.त्यांनी काही सूचना केल्या व त्या सरकारने अमलात हीआल्या आहेत १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासूनआतापर्यंत अनेक समित्यांनी विद्यार्थी केंद्रीत शिक्षणपद्धतीला महत्व दिले आहे. डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्यासमितीद्वारे बहुआयामी शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांचासमग्र विकासावर भर असणार आहे. कोरोनानंतर अनेकआव्हाने शिक्षण क्षेत्रात येणार आहेत, मात्र त्याकडे संधी म्हणून पाहत संशोधक विद्यार्थी घडविण्याचे कार्य करावे.