किसान सन्मान योजनेची नवीन नोंदणी बंद ;  शेतकरी हवालदिल ,  संकेतस्थळावर काेणेतही स्पष्टीकरण नाही

या योजनेतील ७ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. थोड्या बहुत फरकाने सरासरी पाच ते सात हप्ते सर्वांच्याच खात्यावर जमा झाल्याचे दाखवत आहे. या योजनेचा हप्ता जमा झाल्याची बातमी कळताच शेतकऱ्यांची बँकेतून व सर्व सेवा केंद्रातून मोदींचे पैसे आले पण माझे अजून का नाही आले? असा सवाल केला.  

    कवठे : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये नवीन नोंदणी महिनाभर बंद असून याबाबत वेबसाईटवर कोणतेच स्पष्टीकरण दिले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले अाहेत. वेबसाईटवर योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा ११ कोटी ७२ लाख असल्याचे िदसत अाहे. मात्र नवीन नाेंदणी हाेत नसल्याने याेजना गुंडाळली तरी नाही ना ? असा उपराेिधक सवाल शेतकऱ्यांतून केला जात अाहे.

    -काेणाचा या याेजनेत समावेश अाहे.
    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना पेन्शन स्वरुपात काही रक्कम मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सन २०१८ साली सुरु केली. यामध्ये एक गुंठा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून अगदी पाच एकर क्षेत्र असलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सहा हजार प्रतिवर्ष सन्मान पेन्शन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली होती. दर चार महिन्याच्या फरकाने २००० रुपयांच्या तीन हप्त्यात हि पेन्शन २०१९ सालापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. या शेतकरी सन्मान योजनेमुळे गरीब शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साहित्य घेण्यासाठी व बी-बियाणे घेण्यासाठी फायदा होत आहे. केंद्र शासनाची हि योजना शेतकऱ्यासाठी खरोखरच वरदान ठरत अाहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या शासकीय ऑफिसवर व सर्व सेवा केंद्रावर शेतकरी अक्षरश: रांगा लावून आपली नोंदणी करीत होते.

    तांत्रिक कारणामुळे नवीन नोंदणी बंद
    या योजनेअंतर्गत मार्च २०१८ पर्यंत ३ कोटी १६ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. एका वर्षाच्या फरकाने मार्च २०१९ पर्यंत हाच नोंदणीचा आकडा ५ कोटी ७९ लाखांनी वाढून ८ कोटी ९५ लाखांपर्यंत पोहोचला होता. मार्च २०२० पर्यंत हि नाव नोंदणी ७५ लाखाने वाढून ९ कोटी ७० लाखापर्यंत पोहोचली. आता या सन्मान योजनेच्या वेबसाईटवर सद्यस्थितीतील शेतकरी लाभ घेत असल्याचा आकडा ११ कोटी ७२ लाख असल्याचे दाखवीत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत असताना फेब्रुवारी २०२१ पासून नवीन शेतकरी नोंदणी मात्र या वेबसाईटवर होत नाही. ती होत नसल्याचे कारण गेले महिनाभर फक्त ‘काही तांत्रिक कारणामुळे नवीन नोंदणी बंद आहे’ असे दाखवीत आहे.

    मोदीच पैसे आल का ?
    या योजनेतील ७ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. थोड्या बहुत फरकाने सरासरी पाच ते सात हप्ते सर्वांच्याच खात्यावर जमा झाल्याचे दाखवत आहे. या योजनेचा हप्ता जमा झाल्याची बातमी कळताच शेतकऱ्यांची बँकेतून व सर्व सेवा केंद्रातून मोदींचे पैसे आले पण माझे अजून का नाही आले? असा सवाल केला.