गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांची नवी नियमावली ; ‘या’ पद्धतीने साजरा करावा लागणार उत्सव

पुणेकरांना यावर्षी सुद्धा साधेपणानेचं गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. गणेश मुर्ती खरेदी, मुर्ती प्रतिष्ठापणा, देखावे, गणेश मंडळांची भूमिका, विसर्जन, गर्दीचं नियोजन या सर्व गोष्टांवर पुणे पोलिसांची नियमावली लागू आहे.

    पुणे: कोरोना महामारीचे संकट अद्यापही सुटलेले नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत राज्य सरकार तसेच स्थानिक महानगरपालिकांकडून अनेक सण उत्सवांसाठी नियमावली जाहीर केली आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलया गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेनंतर आता पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. शहरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हेतर विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी गर्दी लक्षात घेत विसर्जन मिरवणूकही साधेपणानेच करण्यास सांगण्यात आले आहेत . उत्सवामुळे होणारी गर्दीमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाचे संकट टळेपर्यंत नियमावलीचे पालन करूनच उत्सव साजरे करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    गणेशोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आपली तयारी केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे पोलीस गणेशोत्सवासाठी खास तयारी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी गणेशमुर्ती व्यापारी आणि कारागीर यांच्यासोबत समन्वयाची भूमिका घेतली आहे.

    दरम्यान, पुणे पोलिसांच्या नियमावलीनुसार पुणेकरांना यावर्षी सुद्धा साधेपणानेचं गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. गणेश मुर्ती खरेदी, मुर्ती प्रतिष्ठापणा, देखावे, गणेश मंडळांची भूमिका, विसर्जन, गर्दीचं नियोजन या सर्व गोष्टांवर पुणे पोलिसांची नियमावली लागू आहे. या नियमावलीनुसार सर्वांना गणेशोत्सवाची तयारी करावी लागणार आहे.