Attempted murder case against Raosaheb Danve's son-in-law and former MLA Harshvardhan Jadhav

आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक ही राजकीय हेतूने करण्यात आली आहे. माझी सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील एका दुकानात गेलो असताना फिर्यादीने आम्हा दोघांचे अपहरण करुन आम्हाला मारहाणही केली. यावेळी पोलीस आपली तक्रारच घेत नव्हते असा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला.

पुणे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई तथा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात मंगळवारी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रात्री उशीरा याप्रकरणी त्यांना अटकही झाली. फिर्यादीनंच अपहरण करुन मारहाण केली असल्याचे गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात केले. इतकचं नाही तर राजकीय हेतूने अटक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, बुधवारी जाधव यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक ही राजकीय हेतूने करण्यात आली आहे. माझी सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील एका दुकानात गेलो असताना फिर्यादीने आम्हा दोघांचे अपहरण करुन आम्हाला मारहाणही केली. यावेळी पोलीस आपली तक्रारच घेत नव्हते असा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला.

याशिवाय मारहाणीची घटना सोमवारी घडलेली असताना मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला असेही जाधव न्यायालायात आपली बाजू मांडताना म्हणाले.