नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई घुले यांना पहिल्याच दिवशी कोरोना नियमांचा पडला विसर

महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तुफान गर्दीत उपमहापौरांनी जल्लोष साजरा केला. समर्थकांनी फुलांची उधळण केली. सुरक्षित अंतराची पुरती वाट लागली होती. अनेकांनी मास्कही परिधान केला नव्हता. महापालिका प्रशासनाने या गर्दीला रोखले देखील नाही. गर्दीत कोरोना चेंगरुन मेला की काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आयुक्त राजेश पाटील आता उपमहापौर, त्यांच्या समर्थकांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या नवनिर्वाचित उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांना पहिल्याच दिवशी कोरोना नियमांचा विसर पडला. महापालिका प्रवेशद्वारासमोर तुफान गर्दीत उपमहापौरांनी जल्लोष केला. त्यामुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता. अनेकांनी मास्कही परिधान केला नव्हता. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणा-या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे आयुक्त आता उपमहापौरांवर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. राष्ट्रवादीने या निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रभाग क्रमांक चार दिघी, बोपखेलचे प्रतिनिधीत्व करणा-या भाजपच्या हिराबाई घुले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला चौदाशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रशासन दंडात्मक कारवाई करते. महापौर जनता कर्फ्यूचा इशारा देतात. असे असताना नवनियुक्त उपमहापौर घुले, त्यांच्या समर्थकांना या सर्वांचा विसर पडल्याचे दिसून आले.